You are currently viewing ●…अवलीया  बाबा…●

●…अवलीया  बाबा…●

अवलीया  बाबा

अवलीया अवलीया माझे

गजानन बाबा अवलीया ||

 

रूप गोजीरे तुमचे बाबा

आजानुबाहू तुम्ही यतिवरा

उंच सडसडीत वर्ण सावळा

सतेज की हो तुमची काया

 

अवलिया अवलिया  माझे

 

जात कुळाचा न लागे अंत

खरे खरे हो तुम्ही महासंत

अयोनी तुम्ही नरदेह अवतारी

आलात भूवरी ताराया

 

अवलिया अवलिया माझे

 

कर्म कांडाला देउनी फाटा

दाविल्यातुम्ही भक्तीच्या वाटा

स्वानुभवातून बोध घ्यावा

सांगुनी रचला परमार्थाचा पाया

अवलिया अवलिया माझे

 

शक्ती तुमची अपार बाबा

कणांकणां वरी तुमचा ताबा

पोटां मध्ये नितांत माया

सद्गुरूराया देती छाया….

 

अवलिया अवलीया माझे

गजानन बावा अवलीया

 

सौ. शोभा सतीश राऊत

कोल्हापूर.

मो. 9923897898

7020319035

…जय गजानन माऊली
…गण गण गणांत बोते…

●●●

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply