श्री गजानन स्वामी चरित I
जो नियमे वाचिल सत्य I
त्याचे पुरतील मनोरथ I
श्री गजानन कृपेने II२२३II
- श्री गजानन विजय ग्रंथ, अध्याय २१ वा.
…भव्य जागतिक पारायण सोहळा…
दिनांक :- ०९ जानेवारी २०२२ रविवार
(सकाळी ६.०० वाजेपासून ते २१ अध्याय समाप्तीपर्यंत.)
जय गजानन!
आपण गजानन महाराजांचे परमभक्त आहात हे आम्हास ठाऊक आहे म्हणूनच तुमच्यापर्यंत ही माहिती पोहचवत आहे.
श्री क्षेत्र शेगांव येथील महान योगिराज श्री संत गजानन महाराजांचे आपण सर्व भक्त आहोत. आपले गुरु, आपले माय बाप, आपले पाठीराखे, आपले सर्वस्वी श्री गजानन महाराजच आहेत.
“संत गजानन भक्त परिवाराने” २०१३ पासून जागतिक पारायण सोहळ्याचे आयोजन सुरु केले. आमच्या कडे आलेल्या माहिती प्रमाणे २०१३ मध्ये जगभरातील श्री गजानन महाराजांच्या लाखो भक्तांनी एकाच ) पारायणास सुरुवात केली व श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण पूर्ण केले. त्यानंतर प्रत्येक वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी जागतिक पारायणाचे औचित्य साधून देखील जगभरातील गजानन महाराज भक्तांनी उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने पारायणात भाग घेतला. अर्थात हे सर्व महाराजांच्या आशीर्वादानेच शक्य झाले. भक्तांचा हा भव्य प्रतिसाद बघून महाराजांच्या भक्तांद्वारे व ” संत गजानन भक्त परिवाराने” ठरविल्या प्रमाणे दरवर्षी जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार हा “जागतिक पारायण दिवस” म्हणून पाळण्यात येतो व ह्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने भक्तगण “श्री गजानन विजय ग्रंथाचे” संपूर्ण पारायण करतात. “संत गजानन भक्त परिवाराने” २०१३ पासून जागतिक पारायण सोहळ्याचे आयोजन सुरु केले. आमच्या कडे आलेल्या माहिती प्रमाणे २०१३ मध्ये जगभरातील श्री गजानन महाराजांच्या लाखो भक्तांनी एकाच ) पारायणास सुरुवात केली व श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण पूर्ण केले. त्यानंतर प्रत्येक वर्षी जानेवारीच्या दुसऱ्या रविवारी जागतिक पारायणाचे औचित्य साधून देखील जगभरातील गजानन महाराज भक्तांनी उस्फुर्तपणे हजारोंच्या संख्येने पारायणात भाग घेतला. अर्थात हे सर्व महाराजांच्या आशीर्वादानेच शक्य झाले. भक्तांचा हा भव्य प्रतिसाद बघून महाराजांच्या भक्तांद्वारे व ” संत गजानन भक्त परिवाराने” ठरविल्या प्रमाणे दरवर्षी जानेवारी महिन्याचा दुसरा रविवार हा “जागतिक पारायण दिवस” म्हणून पाळण्यात येतो व ह्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने भक्तगण “श्री गजानन विजय ग्रंथाचे” संपूर्ण पारायण करतात.
आपण सगळे बघतोच आहे की सध्याच्या परिस्थितीत जिकडे तिकडे (जसे की आपल्या मनात, समाजात, देशांतच नव्हे तर संपूर्ण विश्वात) अशांतता, दुःख, समस्या, संकटे पसरली आहेत. पैसा आहे, नाना प्रकारच्या सुखसोयी सुविधा आहेत पण मनाची शांतता नाही. ह्या सगळ्याच्या मुळाशी जावून बघितले तर आपल्या लक्षात येते की ह्या सगळ्यास माणुस स्वतःच जबाबदार आहे. धकाधकीचे जीवन, जास्तीत जास्त पैसा कमावण्याची लालसा यातच माणुस एवढा व्यस्त आहे की त्याला स्वत:साठी, परमार्थासाठी वेळच नाही. परन्तु आता वेळ आली आहे स्वतःसाठी, समाज, देश व विश्वासाठी काही करण्याची. तरी आपणा सर्वास आमची अशी आग्रहाची विनंती आहे की आपल्या सर्वांच्या ह्या “जागतिक पारायण सोहळयात” हिरीरीने भाग घेवुन आपण ह्या पारमार्थिक पुण्याचे भागिदार व्हावे.
श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणा मधे खुप शक्ति आहे हे आपणा सर्वास माहित आहेच श्री गजानन विजयाच्या २१ व्या अध्यायात पारायणाचे सामर्थ्य, फायदे संतकवि श्री दासगणु नी एकदम सरळ सोप्या भाषेत नमूद केले आहे. श्री दासगणु लिहितात.
“श्री गजानन स्वामी चरित I जो नियमे वचिल सत्य I त्याचे पुरतील मनोरथ I श्री गजानन कृपेने II२२३II, अध्याय २१”
जागतिक पारायणाचा उद्देश : जागतिक शांतता, स्त्री सशक्तिकरण, स्त्रीभ्रूण हत्या रोकणे. निसर्गाची कृपा आणि सकळ मानवजातीच्या कल्याणाकरिता महाराजांची कृपा प्राप्त करणे.
संकल्पना : एकाच दिवशी एकाच वेळी जगभरातील श्री गजानन महाराजांच्या भक्तानी जागतिक पारायण करणे
ग्रंथ :- संत कवी दासगणू रचित श्री. गजानन विजय ग्रंथच
पारायणासाठीचा दिवस आणि वेळ: दिनांक :- ०९ जानेवारी २०२२, रविवार
(सकाळी ६.०० वाजेपासून ते २१ अध्याय समाप्तीपर्यंत.)
पारायणासाठी स्थळ :- श्री गजानन महाराजांचे वा कुठलेही मंदिर..
तुमच्या गावात, शहरात किंवा स्वतःच्या घरी सुद्धा.
हे पारायण एकदम मनःपुर्वक, साधेपणाने, शुचिर्भुत राहून करावयाचे आहे.
अनंतकोटी, ब्रम्हांडनायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रम्ह, सच्चिदानंद, भक्तप्रतिपालक, शेगांवनिवासी, समर्थसदगुरु, श्रीगजानन महाराज की जय….!!!!
मूळ संकल्पना व मार्गदर्शन,
ग.म.भ. शशिकांत पोकळे दादा ९७३७३४४४५६
{ मु. पो. मालखेड (रेल्वे) ता. चांदुर (रेल्वे) जिल्हा. अमरावती – महाराष्ट्र } हल्ली मुक्काम वापी (गुजरात)
|| गण गण गणांत बोते ||