●…पार्वती आणि गंगा…●.
पार्वती
आणि गंगा ।
दोघीही
हिमनग दुहिता ।
एक
म्हणे मी बसे वामांकावरी ।
दुसरी
म्हणे मी शोभे मास्तकावरी ।।१।।
दोघीही शिवास ध्याती ।
एक
तयाची शिवशक्ती ।
गंगा
म्हणे मी तर ।
देतसे
लोका सद्गती ।।२।।
सांब
सदाशिव ध्यानी रत ।
कधी
न पडे या वादाप्रत ।
दोघींचे
ही महत्व जाणे ।
अर्धांगी
एक,
दुजी जीवनदायिनी ।।३।।
विष्णुच्या
जन्हू पासुनी ।
निघे
गंगा भगिरथा साठी ।
जटेत
विसावली ती शिवाच्या ।
आली
तेथून गंगासागरतटी ।।४।।
हिमकन्या
ती अपर्णा ।
शिवासाठी
तप आचरी ।
निराहार
राहुनी हिमाचली ।
ओम
नम:शिवाय वदे वैखरी ।।५।।
दोघी
भगिनी श्रेष्ठ त्या असती ।
ना
कुणी मोठे न कुणी धाकटी ।
रूप
जरी वेगळे भासती ।
दोन्ही
शिवाच्याच शक्ती ।।६।।
…ओम नम: शिवाय…
…श्रीगुरुदेव दत्त…
…जय गजानन माऊली…
…गण गण गणांत बोते…
●●●