You are currently viewing शेगांवचा तो गाभारा

शेगांवचा तो गाभारा

शेगावीच्या त्या गाभार्यात पोचल्यावर ही शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत. माणसाचे अहंगंड आपसुक गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रु तरळतात… ही कोणती शरणागती असते; जी देताना राग, लोभ, मत्सर, मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते, कळत नाही… असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुख-दुःख, पाप-पूण्य, सारे मनोगत, मनोरथ सांगून टाकावे. बालहट्ट; हट्ट धरावा… रुसावे फुगावे… हमसुन हमसुन रडावे… लाड करवून घ्यावेत…!!

        गजानन महाराजांकडे अशी कोणती जादू आहे, ज्यामुळे पुण्या मुंबईहुन आलेली जीन्स
आणि टी-शर्ट घातलेली तरुणाई सुद्धा तासन् तास पारायणाला बसतात. रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनीही गाभार्यात पोचल्यावर शांत होतात…!!

      खरच, सद्गुरु गजानन महाराजांनी वर्हाडात प्रकट होवून आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे…!

       “पंढरी आमची शेगाव ! तिथे नांदतो संत गजानन !!”

       ॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद

      भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज की जय ॥

      ।। गण गण गणांत बोते ।।

      

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply