You are currently viewing श्रींचे गादी समोर होणारी सायंकाळची आरती…

श्रींचे गादी समोर होणारी सायंकाळची आरती…

।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय । ।

(चाल आरती भुवनसुंदराची )

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया ।।धृ।।

आवरी जगन्मोहिनीला । दावी चिन्मय स्वरूपाला ।।

देई सद्बुध्दी मजला । प्रेमे तव यश गाण्याला ।। ।।चाल।।

भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण । करूनी भय हरण, दावी सुख सदन ।।

अमित मम दोष त्यागुनीयां । विनवितो दास तुला सदया ।। १ ।।

जन-पदमुक्ति-पदान्याया । स्थली या अवतरला राया ।।चाल।।

ही जड मुढ मनुज-काया । पदीं तव अर्पियली राया ।। ।।चाल।।

हे दिग्वसन योगीराया, नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।।

पुरवी ही आस संतराया । प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।।

नेण्या अज्ञ-तमा विलया । अलासी ज्ञान रवी उदया ।।

करी तु ज्ञानी जनाराया । निरसुनी मोह – पटल माया ।। ।। चाल ।।

गजानन संतराया असशी बळवंत । तसा धीमंत नको बघु अंत । विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दूर करू सदया ।।३।।

-आरती-

आरती सद्गुरू नाथा । अवलीया समर्था ।

आरती ओवाळीतो । मनोभावे मी आता । आरती सद्गुरू नाथा ।।धृ।।

दिधले निजभक्ता । भावे इच्छीत फल त्वा ।

पाजुनि ज्ञानामृता । उध्दरिले समर्था । आरती सद्गुरू नाथा ।।१।।

कविजन गुण गाता । थकियले समर्था ।

अघटित ऐसी लिला । मति धजि ही न आता । आरती सद्गुरू नाथा ।।२।।

विनंती भगवंता । तारी रामात्मज आता । आरती पूर्ण करितो । शरणागत बलवंता । आरती सद्गुरू नाथा ।।३।।

कापुरार्ती –

जयजय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।।

भस्म हे चर्चित निल गलांबर । झल्लालती रूंडमाळा ।।

इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा ।।

शंभो जयजय कर्पूरगौरा ।। १ ।।

श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा ।।

भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा ।।

शंभो जयजय कर्पूरगौरा ।। २ ।।

मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा ।।

काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।।

शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।।

कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं ।।

सदा वसंतं हृदयारविंदे । भवं भवान्यासाहित नमामि ।।

मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।।

नमः शिवाय नमः शिवाय ।। कर्पूर महादीप समर्पयामी ।।

मंत्रपुष्पांजली-

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।। ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । साम्राज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्यान्ताया एकराळिति । तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि, तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।

श्लोक

पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला ।
बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती ।
कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।

-श्लोक-

(वृत्त-भुजंगप्रयात)
सदासर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आता ।।१।।
उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।

-नमस्काराष्टक-

योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।
उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।।
शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।
ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।
भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।
तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। २ ।।
संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।
गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।
आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।
पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।
मध्ये सुशांत गुरुमूर्ति न स्पर्श झाला ।।
ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।
तारीयली सहजची तरि नर्मदेत ।
देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।
ज्याच्या कृपे भवजली तरुनीच जावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।
जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।
पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।
त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।
बाधे तृषा गुरुवरा जल ना मिळाले ।
खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।
प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।
स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।
कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।
घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।। ८ ।।

श्लोक-

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।
त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

-प्रदक्षिणा-

यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।

-क्षमापनम्-

अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पुजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

जय जय रघुवीर समर्थ

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ||

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply