८.

गण गण गणात बोते (भजन)

 

गण गण गणात बोते | हे भजन प्रिय सदगूरूते || धृ ||

या श्रेष्ठ गजानन गुरुते | तुम्ही आठवीत राहा याते ||

 

हे स्तोत्र नसे अमृत ते | मंत्राची योग्यता याते |

हे संजीवन आहे नुसते | व्यावहारीक अर्थ न याते ||१||

 

मंत्राची योग्यता कळते | जो खराच मांत्रिक त्याते |

या पाठे दुःख ते हरते | पाठका अती सूख होते ||

 

हा खचित अनुग्रह केला | श्री गाजानाने तुम्हाला |

घ्या साधूनि अवघे याला | मनी धरून भाव भक्तीला ||२ ||

 

कल्याण निरंतर होई |

दुःख ते मुळी नच राही ||

 

असल्यास रोग तो जाई | वासना सर्व पुरातीलहि |

आहे याचा अनुभव आला | म्हणूनिया कथित तुम्हाला ||

 

तुम्ही बसून क्षेत्र शेगावी | स्तोत्राची प्रचिती पहावी |

ही दंतकथा ना लवहि | या गजाननाची ग्वाही ||३ ||

|| इति समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय ||

९.
श्री  गजानन बावन्नी

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||||

निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||||

सदेह तू परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||||

माघ वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||||

उष्ट्या पत्रावाळी निमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||||

बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||||

गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||||

तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||||

जानाकीरामा चिंचवणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||||

मुकीनु चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०||

विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११||

मधमाश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२||

त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३||

कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४||

वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||

जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||

टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७||

बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८||

रामदास रूपे त्याला | दर्शन देवोनी तोषविला ||१९||

सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०||

कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१||

घुडे लक्ष्मण शेगांवी | येता व्याधी तू निरवी ||२२||

दांभिकता परी ती त्याची | तू न चालवुनि घे साची ||२३||

भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४||

आज्ञा तव शिरसावंद्य | काकही मानती तुज वंद्य ||२५||

विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवऱ्याला ||२६||

पितांबराकरवी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७||

सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८||

सवडद येथील गंगाभारती | थुंकूनि वारिली रक्तपिती ||२९||

पुंडलिकाचे गंडांतर | निष्ठा जाणूनि केले दूर ||३०||

ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१||

माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२||

लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३||

कवर सुताची कांदा भाकर | भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ||३४||

नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५||

बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||

बापुना मनी विठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||

कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८||

वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९||

उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०||

देहान्ताच्या नंतरही | कितीजणा अनुभव येई ||४१||

पडत्या मजूरा झेलियेले | बघती जन आश्चर्य भले ||४२||

अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||

गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४||

शरण जाऊनी गजानना | दु:ख तयाते करी कथना ||४५||

कृपा करी तो भक्तांसी | धावूनि येतो वेगेसी ||४६||

गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७||

बावन्न गुरुवारी नेमे | करा पाठ बहु भक्तीने ||४८||

विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९||

चिंता साऱ्या दूर करी | संकटातूनी पार करी ||५०||

सदाचार रत साद भक्ता | फळ लाभे बघता-बघता ||५१||

सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला ||

जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||

 

|| अनंतकोटी ब्रम्हांडनायक माहाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद

भक्तप्रतिपालक  शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय ||

१०.
श्री गजानन महाराजांचे आवडते भजन

भोलानाथ हे दिगंबर, दुख मेरा हरो रे ।


चंदन चावल बेल की पतिया, शिवजी के माथे धरो रे ।

अगर चंदन का भस्म चढाऊ ते , शिवजी के पैया पडो रे ।

नंदी जो उपर स्वार भये रामा, मस्तकी गंगा धरो रे॥१॥


शिवशंकर को तीन नेत्र है, अद्भुत रुप धरो रे ।

अर्धांग गौरी, पुत्र गजानन, चंद्रमा माथे धरो रे ॥२॥


आसन डाल सिंहासन बैठे, शांती समाधी धरो रे ।

कांचन थाली कपुरे की बाती , शिवजी की आरती करो रे ।

मीरा के प्रभु गिरीधर नागर, चरणो में शीश धरो रे ॥३॥

भोला नाथ हे दिगंबर, दु:ख मेरा हरो रे ।

११.

प्रसाद (अभंग)

पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनिया ताट ॥१॥

शेष घेऊनी जाईन ।तुमचें झालिया भोजन ॥२॥

झालों एक-सेवा । तुम्हां आळवूनी देवा ॥३॥

तुका म्हणे चित्त । करुनी राहिलों निवांत ॥४॥

१२.

पद

(चाल-सखे ग वृंदावनी)

चला हो देवालयिं जाउंया ।

साधुवरा पाहुं या, ध्याउं या हो ।। धृ ।।

येई जगाला, उद्धरण्याला शेगांवी मुनिराज ।

त्रिभूवनतारक राघवसेवक तारी भक्तसमाज ।

चला हो ।। १ ।।

चालती नाव कालप्रवाहीं न दिसे त्याचें तीर ।

नाविक होई सद्गुरु दीनां पोंचवी सौख्ये पार ।

चला हो ॥२॥

सामर्थ्यातं वर्णायाला कोण समर्थ जनीं ।

ब्रह्मा विष्णु शिवमूर्ति अवलिया वंदू वारंवार ।

चला हो ॥३॥

१३.

श्लोक

(वृत्त-पंचचामार)

नमो गुरु शुभांकरा नमो गुरु कृपा करा ।

नमो गुरू तमाहरा नमो गुरु परात्परा ॥

नमो मती प्रभाघना नमो गुरु निरंजना ।

नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||||

नमो गुरु यतीश्वरा नमो गुरु मनोहरा ।

नमो गुरु भवाहरा नमो पदीं निरंतरा ।।

नमो गुरु कृपाघना नमो सुभाव दे मना।

नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||||

नमो सुभक्ततारका नमो दुरितहारका ।

नमो गुरु कृतांतका नमो रिपूं संहारका |

नमो गुरु त्रिलोक्यपाळणा नमो हरी ही कल्पना ।

नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||||

नमो रुपें सुनिर्मळा नमो करी भवागळा ।

नमो जनास प्रेमळा नमो अतर्क्य ही कळा ||

 नमो भ्रमास छेदना नमो कुभावदंडना ।

नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ||||

नमो गुरुस आठवा नमो हरी भवार्णवा ।

नमो गुरु कृपार्णवा नमो मतीस वाढावा ॥

द्दढीं सुभाव उत्तमा करी पदास वंदना ।

नमो नमो नमो नमो नमो गुरु गजानना ॥५॥


॥अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्रीगजानन महाराज की जय॥

X