You are currently viewing ।। श्री रेणुकादेवी स्त्रोत-स्तवन ।।

।। श्री रेणुकादेवी स्त्रोत-स्तवन ।।

अंबे महान्निपुरभैरवी आदिमाये ।
दारिद्रय दुःखमय हारुनि दावी पाये ।
तुझा अगाद महिमा वदती पुराणी ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…||१||

आता क्षमा करि शिवे अपराध माझा ।
मी मुठ केवळ असे परी दास तुझा ।
तू सोडशील मजला झीण तो निदानी |
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…||२||

निष्छूरता धरिशी तू जरि ध्यानी आई ।
रक्षील कोण मज सांग उपाय काही ।
आनंद सिंधू लहरी गुण कोण वाणी ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…||३||

लज्जा समस्त तुजला निज बालकाची ।
तु माऊली अति स्वये कनवेळू साची ।
व्हावे प्रसन्न करुणा परि सोनि कानी ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…||४||

जाळीतसे बहुत हा भवताप अंगी । |
त्याचे निवारण करी मज भेट वेगी ।
तुझाच आश्रय असे जगी सत्यमानी ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी… ||५||

नेणी पदार्थ तुवाचीनि अन्य काही |
तू माय-बाप अवघे गणगोत पाही ।
आणिक देव दुसरा हृद्यात नाही ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…||६||

तूं या त्रिभुवनात समर्थ होशी ।
धाके तुझ्या पळसुटे रिपुदानवासी ।
येती पुजसे सुर बैसोनिया विमानी ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…||७||

हे चालते वय वृथा भुललो प्रपंची ।
तूही करुनि स्थिरता न घडे मनाची ।
दुःखार्णवांत बुडती धरी शीघ्रपाणी ।
श्री रेणुके भगवते वरदे भवानी…।।८।।

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply