संतमहंत सांगती
धरा नामाची संगती ll
सदा नाम मनी धरा
टाका जाळूनी विकारा ll
नाम आहे सर्वोपरी
जाईल दुर्गुण दुरी ll
नामाची लागता गोडी
दिखाव्याचा मोह सोडी ll
नाम सोबत सदैव
पाठ सोडील दुर्दैव ll
नाम हृदयी ठसते
राग लोभ शांतविते ll
घेता ओठी राम नाम
क्षणी होई काजकाम ll
नाम हेची आहे पुण्य
होई पाप ताप शून्य ll
करावें नामस्मरण
सुखी होईल जीवन ll
नाम देई तुम्हां साक्ष
जीवनी मिळेल मोक्ष ll
नका करू रे आळस
नाम दाखवी कळस ll
तारण्या भवसागर
करा नामाचा गजर ll
सौ शोभा सतीश राऊत,
– कोल्हापूर.
दि. 11/09/2021
मो. 9923897898