जयजय कर्पूरगौरा ।
तारी जयजय कर्पूरगौरा ।।धृ।।
भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा ।।
इंदु लल्लाटी शोभतसे कटी ।
गजचर्म व्याघ्रांबरा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१ ।।
श्वेतासनी महाराज विराजित ।
अंकी बसे सुंदरा ।
भक्त दयाघन वंदिती चरण ।
धन्य तु लीलावतारा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।। २ ।।
मतिमंद दीन झालो पदी लीन ।
पार करी संसारा ।
काशीसूतात्मज मागतसे तुज ।
द्या चरणी मज थारा ।।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।।
कर्पूरगौरं करूणावतारं ।
संसारसारं भुजगेंद्रहारं ।
सदा वसंतं हृदयारविंदे ।
भवं भवान्यासाहित नमामि ।।
मंदारमाला कपाल काय ।
दिगंबराय दिगंबराय ।।
!! गण गण गणात बोते !!