...दुर्वांकूर: २१ नमस्कार...
शेगांव ग्रामी वसले गजानन
स्मरणे तयांच्या हरतील विघ्न
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरूला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१||
तेऊनि तेथे अकस्मात मूर्ती
करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरूला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||२||
उन्हातहानेची नसे त्यास खंत
दाविले सत्य आशेची संत
पाहुनी त्या चकित बंकाटलाल झाला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||३||
घेउनी गेला आपुल्या गृहासि
मनोभावे तो करी पूजनासी
कृपा प्रसादे बहुलाभ झाला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||४||
मारानोंमुखी तो असे जानराव
तयांच्यामुळे लाभला त्यास जीव
पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||५||
पहा शुष्कवापी भरली जलाने
चिलीम पेटविली तये अग्निविणे
चिंचवणे नाशिले करी अमृताला
नमस्कार माझा श्री गाजजानानाला ||६||
ब्राम्हगीरीला असे गर्व मोठा
करी तो प्रचारा अर्थ लाऊनि खोटा
क्षणार्धात त्याचा परिहार केला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||७||
बागेतली जाती खाण्यास कणसं
धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश
योगबले काढीले कान्त्काला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||८||
भाक्तांपरी प्रीत असे अपार
धावुनी जाती तया देती धीर
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||९||
बुडताच नौका नर्मदेच्या जलात
धावा करिती तुमचाची भक्त
स्त्रीवेष घेउनी तिने धीर दिला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||१०||
संसार त्यागीयेला बायाजाने
गजानन सानिध्य वाहि जिने
सदा स्मरे ती गुरुच्या पदाला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||११||
पितांबरा करी भारी उदकात तुंबा
पाणी नसे भारविन्या नाल्यास तुंबा
गुरु कृपेने तो तुंबा बुडाला
नमस्कार माझा श्री गाजाननाला ||१२||
हरित पर्ण फुटले शुष्क अम्रवृक्षा
पितांबराची घेत गुरुपरीक्षा
गुरुकृपा लाभली पितांबराला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१३||
चिलीम पाजावी म्हणुनी श्रींशी
इच्छा मनी जाहली भिक्षुकासी
हेतू तयाचा अंतरी जाणियेला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१४||
बाळकृष्णघरी त्या बळापुरासि
समर्थ रूपे दिले दर्शनासि
सज्जन गडाहुनि धाउनी आला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१५||
नैवेद्य पकवान बहु अनियेले
कांदा भाकारीसी तुम्ही प्रिय केले
कवरांसी पाहुनी आनंद झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१६||
गाडी तुम्ही थांबविली दयाळा
गरुडा प्रति दाविलीये हो लीला
क्षणार्धात त्याचा परिहार केला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१७||
जातिधर्म नाही तुम्ही पाळीयेला
फकीरासवे हो तुम्ही जेवियेला
दाऊनि ऐसे जना बोध केला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१८||
अग्रवालास संगे म्हणे राममूर्ती
अकोल्यास स्थापूनी करी दिव्य कीर्ती
सांगता क्षणी तो पहा मानियेला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||१९||
करंजपूरीचा असे विप्र एक
उदरी तयांच्या असे हो की दुःख
दुःखातूनि तो पहा मुक्त झाला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||२०||
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस
नमस्कार रूपी श्री गजाननास
सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला
नमस्कार माझा श्री गजाननाला ||२१||