१४.

"गण गण गणात बोते" (जप-१ माळ)

"श्रीराम जय राम जय जय राम" (जप-१ माळ)

१५.

पसायदान

प्रभू थोर शेगावचा तूच आहेस । अनन्यास रक्षीतुझे ब्रीद आहे ।

करुणाकराया, ब्रीदा सार्थ व्हावे । महाराज, माझ्या जवळी रहावे ।। १ ।।

असे मागणे ते तुझ्या पायी आता । तुझ्याविण कोणी मला नाही त्राता ।

प्रभो सर्व या, संकटा निरवावे । महाराज, माझ्या जवळी रहावे ||||

प्रभो ! जन्मी या मी, किती पाप केले । तया जाणिवेने, मन हे जळाले ।

आता मात्र देवा, मला आवरावे । महाराज, माझ्या जवळी रहावे || ||

अपराध माते ! पदरात घ्यावे । आता बालक या जवळी करावे ।

तुझ्या "प्रकृतीला" गडे आवरावे । महाराज माझ्या जवळी रहावे ||||

प्रभातीस अस्पष्टसी जाग यावी । तुझिया कृपेने, कुडी ही उठावी ।

शुचिर्भूत प्राची स्मृतीदान द्यावे । महाराज, माझ्या जवळी रहावे ।।५।।

कदा क्रोध, दोषा, मना ना शिवावे । शुचिर्भूत आचार वृत्तीत यावे ।

तै शुद्ध बुद्धी मला दान द्यावे । महाराज माझ्या जवळी रहावे ||||

आम्हा अन्न देतो, तया आधी देणे । तयावीण आम्ही, कदा नाही खाणे |

इये वृत्तिने शक्तिदानास द्यावे । महाराज माझ्या जवळी रहावे ।।७।।


नीतीयुक्त सात्वीक, लक्ष्मी मिळावी । प्रपंचात सत्कर्मी, ती वापरावी ।

अशा दृष्टीने, “लक्ष्मीदानास द्यावे । महाराज माझ्या जवळी रहावे ।।८।।

सुखे झोपता जाण काढोनी घ्यावी । बरे, वाईटाची स्मृती ना रहावी ।

शांतिदानास द्यावे । महाराज, माझे जवळी रहावे ।।९।।

कृपाळूपणे ' प्रपंचात कर्मे, असता करीत । तयामाजी राहो, सदा सावचित्त ।

अनैतिक कृत्ये, कदा ना घडावी । महाराज माझे जवळी रहावे ।।१०।।

भवांमाजि कर्मे, नियमित व्हावी । कुटूंबा, मुलांची प्रीती सार्थ व्हावी ।

व्यवहार चित्ते, असक्ते रहावे । महाराज माझे जवळी रहावे ।।११।।

नको काम, क्रोध नको दुष्ट बुद्धी । सुविचार शांती, समाधान वृद्धी ।

असे भाव माझ्या, मनी नित्य यावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१२।।

प्रति मासी वा वर्षी हा योग यावा । तुझ्या मंदिरी दर्शन लाभ व्हावा ।

अखंडित वारी, मला गुंतवावे । महाराज माझे जवळी रहावे ||१३||

धन, मन, कीर्ती, प्रपंची मिळाले । कधी दुःख भोग पदरांत आले ।

इये दोन्ही काळी, समत्वे तरावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१४।।

तुम्हा वर्णिता, वर्णिता, मी रमावे । समस्तांचिया अंतरी एक व्हावे ।

माझे तुझे तई, अभिन्नत्व व्हावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१५।।

तुझ्या चिंतनी चित्त एकत्र व्हावे | तुझ्या दर्शने नेत्र तृप्तीस व्हावे ।

तुला पाहता पाहता, भान जावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१६।।

तुझी मूर्त दृष्टी समोरी असावी । प्रभो माझी देहस्थिती विसरावी ।

तुझे विण आता, कुणी ना दिसावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१७।।


यमुना जलाने, शुचि स्नान व्हावे । मुखी शुद्ध गंगोदके या पडावे ।

ओठांत तुलसी दलाने रहावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१८।।

त्रिगुणात्मके, भाव वृत्ती नसावा । प्रसादे तुझ्या, भोग माझा सरावा ।

पुढे जन्म-मृत्यु कदाना मिळावे । महाराज माझे जवळी रहावे ।।१९।।

दिला मोक्ष तू, भास्करा बा जसा रे । दिला मोक्ष तू भक्त बाळा जसा रे ।

मला ही प्रभो, त्या स्थळा पोचवावे । महाराज माझे जवळी रहावे ||२०||

क्षणी शांत ऐसा, प्रभो प्राण जावा । जिवा आसरा त्या शिवाचा मिळावा |

मिसळून ज्योतीस तेजात घ्यावे । महाराज माझे जवळी रहावे ||२१||