!!!…श्री गजानन बावन्नी…!!
जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१||
निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२||
सदेह तू, परी विदेह तू | देह असूनि देहातीत तू ||३||
माघ वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४||
उष्ट्या पत्रावळीनिमीत्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५||
बंकट लालावरी तुझी | कृपा जाहली ती साची ||६||
गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७||
तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८||
जानाकीरामा चिंचवणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९||
मुकीन चंदूचे कानवले | खाऊनि कृतार्थ त्या केले ||१०||
विहिरीमाजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११||
मधमाश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२||
त्यांचे काटे योगबले | काढुनि सहजी दाखविले ||१३||
कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४||
वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५||
जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६||
टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७||
बाळकृष्ण बाळापुरचा | समर्थ भक्तची जो होता ||१८||
रामदास रूपे त्याला | दर्शन देवूनि तोषविला ||१९||
सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०||
कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१||
घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२||
दांभिकता परी ती त्याची | तू न चालवूनी घे साची ||२३||
भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४||
आज्ञा तव शिरसावंद्य | काकही मानती तुज वंद्य ||२५||
विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जव-याला ||२६||
पितांबराकरवी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७||
सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८||
सवडद येतील गंगाभारती | थुंकूनि वारिली रक्तपिती ||२९||
पुंडलिकाचे गंडांतर | निष्टा जाणून केले दूर ||३०||
ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१||
माधवनाथा समवेत | केले भोजन अच्चिष्ठ ||३२||
लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३||
कवर सुतांची कांदा भाकर | भक्षिलीस तू त्या प्रेमाखातर||३४||
नग्न बैसुनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५||
बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावरी विरक्त प्रीती ||३६||
बापुना मनी विठ्ठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७||
कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८||
वासुदेव येती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९||
उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०||
देहांताच्या नंतरही | कितीजना अनुभव येई ||४१||
पडत्या मजूरा झेलीयले | बघती जन आश्चर्य भले ||४२||
अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३||
गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४||
शरण जाऊनी गजानना | दु:ख तयाते करी कथना ||४५||
कृपा करी तो भक्तांसी | धावूनि येतो वेगेसी ||४६||
गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७||
बावन्न गुरुवारी नेमे | करा पाठ बहु भक्तीने ||४८||
विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९||
चिंता सा-या दूर करी | संकटातूनी पार करी ||५०||
सदाचार रत सद भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१||
सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला ||
जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२|| || गण गण गणात बोते ||