You are currently viewing ●…भीमरूपी मारुती स्तोत्र…●

●…भीमरूपी मारुती स्तोत्र…●

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥

 

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
  सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥

 

दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
  पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥

 

 लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
   पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥

 

  ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
  काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥

 

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥

 

  पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥

 

  ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
  चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥

 

कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।

मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥

 

आणिला मागुतीं नेला

आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें गतीसी

 तूळणा नसे ॥१०॥

 

अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें

मेरु- मांदार धाकुटे ॥११॥

 

ब्रंम्हांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करुं शके |

तयासी तुळना कैची,

ब्रम्हांडी पाहता नसे ||१२||

 

आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥

 

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि

स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥

 

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता

आनंदे भीमदर्शनें ॥१५॥

 

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निःसंदेहो

संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥

 

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥

 

इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रम् संपूर्णम् ॥

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply