|| सदगुरु प्रार्थना || सदगुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहु ।ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ॥धृ०॥ निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ ।ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु ॥१॥ उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू ।बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ ॥२॥ कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू ।करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥३॥ अजाण हतबल भ्रमीत मनिची तळमळ कशी साहू ।निरसूनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ॥४॥ ...दूर्वांकूर: २१ नमस्कार... ...Download in PDF... ...पार्वती अणि गंगा... Leave a Reply Cancel replyCommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Save my name, email, and website in this browser for the next time I comment.