गण गण गणात बोते | हे भजन प्रिय सदगूरूते |
या श्रेष्ठ गजानन गुरुते | तुम्ही आठवीत राहा याते ||
हे स्तोत्र नसे अमृत ते | मंत्राची योग्यता याते |
हे संजीवन आहे नुसते | व्यावहारीक अर्थ न याते ||१||
मंत्राची योग्यता कळते | जो खराच मांत्रिक त्याते |
या पाठे दुःख ते हरते | पाठका अती सूख होते ||
हा खचित अनुग्रह केला | श्री गाजानाने तुम्हाला |
घ्या साधूनि अवघे याला | मनी धरून भाव भक्तीला ||२ ||
कल्याण निरंतर होई |
दुःख ते मुळी नच राही ||
असल्यास रोग तो जाई | वासना सर्व पुरातीलहि |
आहे याचा अनुभव आला | म्हणूनिया कथित तुम्हाला ||
तुम्ही बसून क्षेत्र शेगावी | स्तोत्राची प्रचिती पहावी |
ही दंतकथा ना लवहि | या गजाननाची ग्वाही ||३ ||
|| इति समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय ||
*****