
एकवेळ घे गुरु नाम
रोज करी एकतरी चांगले काम
गुरु प्रतिमेला एक वेळ
घाल तू पुष्पाची माळ ।
येणार नाही तुझ्या वर वाईट वेळ
आले जरी कधी काळी
वाईट काळ आणि काळ
सद्गुरु करील त्याचा सांभाळ
सर्वावरी करा रे निरागस प्रेम ।
रोज एकवेळ तरी घे गुरु नाम
गुरु पुढे लावशिल
भावाने अगरबत्ती
गुरु करतील त्याची
शुध्द मती
गुरु नाम हिच आमची शक्ती ।
सत्यनिती धर्माने वागावे
हिच खरी गुरुभक्ती
सद्गुरु पुढे लावा रे दिप।
गुरु कृपेने जळतील पाप
करा गुरु नामाचा सदैव जाप।
सद्गुरु करतील अंतर्मन साफ
भोळ्या मनाने रोज एकदा तरी
घ्या रे गुरु नाम।
एकतरी करा रे चांगले काम
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते
🙏🙏🙏🙏🙏