You are currently viewing फाल्गुन वद्य एकादशी.

फाल्गुन वद्य एकादशी.

कालचा दिवस म्हणजे फाल्गुन वद्य एकादशी. कालच्याच दिवशी फाल्गुन वद्य एकादशी शके १८६८ (मंगळवार दि. १८ मार्च १९४७) संतकवी श्री दासगणू महाराजांनी श्री गजानन प्रार्थना स्तोत्राची रचना पूर्ण केली. काल या विशेष प्रसंगास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
 
श्री संत गजानन महाराजांच्या नित्य पठणासाठी लहानसे स्तुति स्तोत्र करून द्यावे, अशी रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील, व्यवस्थापक श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, यांनी विनंती केल्यावरून संतकवी श्री दासगणू महाराजांनी हे १८१ ओव्यांमध्ये लहानसे स्तोत्र लिहिले आहे. यामध्ये श्री गजानन महाराजांच्या बहुतेक चरित्राचा गोषवारा/ सार आलेला आहे. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या निस्सीम भक्तांची विशेष सोय झाली आहे.

 

श्री संत गजानन महाराजांच्या नित्य पठणासाठी लहानसे स्तुति स्तोत्र करून द्यावे, अशी रावसाहेब रामचंद्र कृष्णाजी पाटील, व्यवस्थापक श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, यांनी विनंती केल्यावरून संतकवी श्री दासगणू महाराजांनी हे १८१ ओव्यांमध्ये लहानसे स्तोत्र लिहिले आहे. यामध्ये श्री गजानन महाराजांच्या बहुतेक चरित्राचा गोषवारा / सार आलेला आहे. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या निस्सीम भक्तांची विशेष सोय झाली आहे.

 

 

स्तोत्रपठकां उत्तम गती। तैशी संतती संपत्ती । धर्मवासना त्यांच्या चित्तीं| ठेवा जागृत निरंतर ॥१६९॥ भूतबाधा भानामती । व्हावी न स्तोत्र पठकांप्रती । लौकिक त्याचा भूवरती । उत्तरोत्तर वाढवावा ||१७०।। हे स्तोत्र ना अमृत । होईल अवघ्या भाविकांप्रत । येईल त्याची प्रचित । सद्भाव तो ठेविल्या ||१७१।। सद्गुरुने चित्तास। पहा माझ्या करून वास । बोलविलें या स्तोत्रास ! तुमच्या हिताकारणें ॥१७३॥ स्तोत्रपठका भूमीवरी । कोणी न राहील पहा वैरी । अखेर मोक्ष त्याच्या करी । येईल की नि:संशय ॥ १७८॥
 
जय गजानन ||

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply