You are currently viewing ●…माझं आणि समर्थांचं नातं…●

●…माझं आणि समर्थांचं नातं…●

            असंच महाराजांच्या आठवणीत बसलेलो असताना महाराजांनीच लिहून घेतलेली, सुचवलेली एक कविता… 

 

माझं आणि समर्थांचं;

नातंच वेगळं आहे,

मी यांचा भक्त,

आणि हेच माझं सगळं आहे…

 

हेच माझे आई-बाप;

मी तर ह्यांचाच हो बाळ,

महाराहांराजांचाच सहवास,

हेच माझ्या कर्माचं फळ… 

 

इथं कोणीही नाही रिक्त;

होतील सगळेच मुक्त,

अहो यासाठीच तर आहे;

हे शेगांवीचे तख्त…

 

आपल्या सर्वांचं तर;

एकच आहे रक्त,

का की आपण तर;

सगळेच गजानन भक्त…

 

सदा सर्वदा एकचि मागावे;

सत्कर्म योगे वय घालवावे,

चरणी तुझ्या मी सदा राहावे,

सदा सर्वदा तुला आठवावे…

 

नित्य सदा मी;

फक्त तुलाचि भेटावे,

तुझ्याच सोबतीमध्ये पुन्हा;

मी मलाचि खेटावे…

 

तुझ्याच सोहळ्यांसाठी;

मी सदा नटावे,

आयुष्याचे हे पुण्यवृक्ष;

तुझ्याच पायाशी वटावे…

 

आपल्या अभंगांमध्ये मी;

नेहमी मलाच शोधतो,

माझ्या ताल-सुरांद्वारे;

पुन्हा तुम्हालाच वेधतो…

कधी तर काही जण चिडतात सुद्धा;

आणि म्हणतात,

काय हे असभ्य बोलणं?

त्यांच्या भक्तांचं हे अरे-तुरेचं बोलणं??

अहो हे तर मायलेकराचं;
ते नातंच देखणं…!!

जय गजानन…! 

श्री गजानन…!!

– प्रा. रोहित माने, माले.

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply