कितीक सरले कितीक उरले,
आयुष्याला मोजु नका.
मस्त जगूया आनंदाने,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...नाही पटले काही जरीही
उगाच क्रोधीत होऊ नका.
व्यक्ती तितक्या विचारधारा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...योग्य अयोग्य चूक बरोबर,
मोजमाप हे लावू नका.
विवेक बुद्धि प्रत्येकाला,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
सुख दुःख हे पुण्य पाप ते,
दैव भोग हे तोलू नका.
कर्म फळाच्या सिद्धांताचा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...
खाण्या बाबत हट्टी आग्रही,
कधी कुठेही राहू नका.
खाऊ मोजके राहू निरोगी,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
संस्कारांचे मोती उधळले,
पैसा शिल्लक ठेवू नका.
पैसा करतो आपले परके,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...मत आपले,विचार,सल्ला,
विचारल्या विण देऊ नका.
मान आपला आपण राखा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...नित्यच पाळा वेळा,
सर्व वेळी अवेळी जागू नका.
पैश्याहुनही अमूल्य वेळा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...नाही बोलले कुणी तरीही,
वाईट वाटुन घेऊ नका.
मौन साधते सर्वार्थाला,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...जगलो केवळ इतरांसाठी.
कुठेच आता गुंतू नका.
फक्त जगुया आपल्यासाठी,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...जाणा कारण या जन्माचे,
वेळ व्यर्थ हा घालू नका.
श्वासोश्वासी नामच घ्यावे,
मंत्र मुळी हा सोडू नका.
श्री स्वामी समर्थ !!
...