संजीवन समाधी घेऊन
गेले शतक उलटून
तरीही महाराज तुम्ही
भक्तांसाठी येता धावून
समाधी घेताना महाराज
गेलात सर्वांना सांगून
गेलो असे समजू नका
हे सत्य देता दाखवून
महाराज तुम्ही आहात
स्थित पुण्य शेगांव नगरी
म्हणूनच आम्हां वाटते
हिच आहे काशी पंढरी
त्याकाळचे भक्त श्रेष्ठ
प्रत्यक्ष होई तुमची भेट
आम्ही किती हो दुर्भागी
दर्शन सद्या होईना थेट
आजच्या दिनी महाराज
कळवळून करते प्रार्थना
मंदिरे ही सारी उघडू दे
दूर जाऊदे हा कोरोना
इथून करते नमस्कार
महाराज करा स्वीकार
आजच्या समाधी दिनी
ब्रह्मांडी तुमचा जयकार
जय गजानन जय गजानन
म्हणूनया आपण सारे जण
गजानन माउलींच्या नामांत
भारावतो पृथ्वीचा कण कण
सौ शोभा सतीश राऊत,
– कोल्हापूर.
दि. ११-०९-२०२१
मो. ९९२३८९७८९८