You are currently viewing सार्थ सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र
दुर्मिळ असे सार्थ सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र...

सार्थ सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र

दुर्गास्तोत्र…

सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र

अस्य श्रीदुर्गासप्तश्लोकीस्तोत्रस्य नारायण ऋषिः । अनुष्टुप् छंदः ।

श्री महाकालीमहालक्ष्मीमहासरस्वती देवताः । श्री दुर्गाप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।

या सात श्लोकांच्या दुर्गास्तोत्राचे ऋषि नारायण आहेत, छंद अनुष्टुप् असून श्रीमहाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या देवता आहेत. श्रीदुर्गा प्रसन्न व्हावी म्हणून जप करीत आहे.

 

ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा ।
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ॥ १॥

ती भगवती महामाया देवी, ज्ञानसंपत्र लोकांची अंत:करणेसुद्धा आपल्या शक्तीने खेचून मोहाकडे प्रवृत्त करते.

 

दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोः। स्वस्थै: स्मृता मतिमतीव शुभां ददासि ।।

दारिद्र्यदुःखभयहारिणि का त्वदन्या । सर्वोपकारकरणाय सदार्द्र चित्ता ॥ २ ॥

हे दुर्गे, तुझे स्मरण करताच तू सर्व प्राण्यांची भीति नाहीशी करतेस. शांत चित्ताने स्मरण करणाऱ्यास विशुद्ध बुद्धि देतेस, दारिद्र्य, दुःख व भीति नष्ट करणारी तुझ्यावाचून दुसरी कोण आहे? सर्वांवर उपकार करण्यास तू नेहमी दयाळू असतेस.

 

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ||३||

सर्व मंगलांचे मंगल अशा शिवे, तू सर्व काही साधून देतेस. शरण आलेल्यांचे रक्षण करतेस, हे त्र्यम्बके गौरि नारायणि तुला नमस्कार असो.

 

शरणागत दीनार्त परित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोस्तुते ||४||


शरण आलेल्यांचे, दुःखितांचे, पीडितांचे रक्षण करण्यांत तत्पर असणाऱ्या देवि, सर्वाची पीडा हरण करणाऱ्या, नारायणि, तुला नमस्कार असो.


सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।

भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ॥५॥

जिच्यात सर्व शक्ति एकवटल्या आहेत अशा सर्वव्यापी सर्वेश्वरी देवि, आमचे भीतीपासून रक्षण कर. हे दुर्गे, तुला नमस्कार असो.


रोगानशेषानपहंसि तुष्टा ।  रुष्टा तु कामान् सकलानभीष्टान् ।।
त्वामाश्रितानां न विपन्नराणां ।  त्वामाश्रितां ह्याश्रयतां प्रयान्ति ॥ ६ ॥

तू ज्यांच्यावर संतुष्ट होतेस, त्यांचे समूळ रोग नष्ट करतेस. तू ज्यांच्यावर रागावतेस, त्यांचे इच्छित हेतु पूर्ण होत नाहीत. तुझ्या आश्रयाला येतात, त्यांच्यावर संकटे येत नाहीत. जे तुझा आश्रय घेतात तेही इतरांचे आश्रयस्थान होते.

 

सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि ।

एवमेव त्वया कार्यं अस्मद्वैरिविनाशनम् ॥७॥

हे तिन्ही जगाचे ईश्वरी, सर्व अडचणींचे तू निवारण कर. आमच्या शत्रूंचा नाश करण्याचेच कार्य तू करावेस.

॥ इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्रम् ॥

देवी कवच

॥ अथ देव्याः कवचम् ॥
ॐ अस्य श्रीचण्डीकवचस्य ब्रह्मा ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, चामुण्डा देवता अंगन्यासोक्तमातरो बीजम्, दिग्बन्धदेवतास्तत्त्वम्, श्रीजगदम्बाप्रीत्यर्थे जपे विनियोगः ।

ॐ श्री चण्डीकवचाचे ऋषि ब्रह्मा असून छन्द अनुष्टुप् आहे. देवता चण्डी आहे; अंगन्यासातील मातृका हे बीज असून दिशाबंधनातील देवता हे तत्त्व आहे. श्री जगदम्बा प्रसन्न व्हावी म्हणून हे चण्डीकवच म्हणत आहे.

ॐ नमश्चण्डिकायै ॥

ॐ चण्डिकादेवीला नमस्कार असो.

 

ॐ यद्गुह्यं परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम् ।

यन्त्र कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ॥ १ ॥

मार्कण्डेय ऋषि ब्रह्मदेवाला विचारतात-

हे पितामह, या जगात अतिशय गुप्त स्वरूपाचे असलेले, माणसांचे सर्व तर्‍हेचे रक्षण करणारे, व जे कोणालाही संगीतलेले नाही ते मला सांगा.

 

ब्रम्होवाच:

अस्ति गुह्यतमं विप्र भूतोपकारकम ।

देवयास्तु कवचं पुण्यं तच्छृणूष्व महामुने  ॥ २ ॥

ब्रंहादेवांनी उत्तर दिले –

अतिशय गुप्त असलेले, सर्व प्राणिमात्रांना उपयोगी पडणारे असे पुण्यकारक देवीकवच आहे.

हे महर्षि तू ऐक.

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्राम्हचारिणी ।

तृतीयं चंद्रघंटेति कूष्मान्डेति चतुर्थकम ॥ ३ ॥

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च ।

सप्तमं कालरात्रीश्च महागौरीति चाष्टमम  ॥ ४ ॥

  नवमं सिद्धिदात्रि च नवदूर्गा: प्रकीर्तीता: ।

उक्तान्येतानि नामानि ब्राम्हमणैव महात्माना ॥ ५ ॥

देवीची नऊ नावे तिच्या अवतारांमुळे ‘नवदुर्गा’ या नावाने सांगितलेली आहेत. ती अशी पहिले शैलपुत्री, दुसरे ब्रह्मचारिणी, तिसरे चन्द्रघण्टा, चौथे कुष्माण्डा, पाचवे स्कंदमाता, सहावे कात्यायनी, सातवे काळरात्री, आठवे महागौरी व नववे सिद्धिदात्री. ही नवदुर्गांची नावे महात्मा ब्रह्मदेवानेच सांगितली आहेत.

 

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे।
विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः ||६||

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे ।
नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं नहि ॥७॥

आगीत होरपळत असेल, रणांगणात शत्रूने घेरले असेल, अवघड जागी संकटात पडलेले असतील, भयभीत, देवीला शरण गेलेले असतील, अशांचे युद्धसंकटातही अनिष्ट होत नाही. त्यांच्यावर आपत्ती येत नाहीत व त्यांचे शोक, दुःख, भय नष्ट होतात.

 

यैस्तु भक्त्या स्मृतानूनं तेषां सिद्धिः प्रजायते ।
ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः ॥८॥

ज्यांनी खरोखर भक्तिभावाने तुझे स्मरण केले, त्यांना ऋद्धि सिद्धि प्राप्त होते. हे देवेश्वरी, जे तुला आठवतात त्यांचे तू नि:संशय रक्षण करतेस.

 

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ।

ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना ||९||
माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना ।

लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया ॥ १०॥
श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ।

ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता ।। ११ ।।
इत्येताः मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः ।

नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः ।।१२।।

(मातृदेवतांच्या अवस्थांचे वर्णन यापुढील श्लोकात केलेले आहे)

चामुण्डा ही प्रेतावर आरूढ होणारी ( बसणारी), वाराही रेड्यावर, ऐन्द्री हत्तीवर, वैष्णवी गरुडावर, माहेश्वरी बैलावर, कौमारी मोरावर, लक्ष्मी कमळावर, पद्महस्ता ( हातात कमळ धारण केलेली) विष्णूला प्रिय. पांढरें शुभ्र स्वरूप असणारी देवी, बैलावर बसलेली ईश्वरी, ब्राह्मी हंसावर असून सर्व तऱ्हेच्या दागिन्यांनी मढलेली आहे. ह्या सर्व माता योगातील असून अनेक वस्त्रांनी व रत्नांनी शोभिवंत आहेत.

 

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः ।
शंखं चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम् ||१३||

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च ।
कुन्तायुधं त्रिशूलं च शार्ङ्गमायुधमुत्तमम् ।। १४
।। दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च ।

धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै ।। १५ ।।

 

या देवी क्रोधयुक्त रथात बसलेल्या दिसतात. दैत्यांना ठार मारण्यासाठी, देवांच्या हितासाठी व भक्तांना अभय देऊन, त्यांचे रक्षण करण्याकरिता देवींनी शंख, चक्र, गदा, शक्ती, नांगर, मुसळ, खेटक, तोमर, कुऱ्हाड, फांस, भाला, त्रिशूल व उत्कृष्ट शारंगधनुष्य अशी शस्त्रे धारण केलेली आहेत.
नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे ।
महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि ।। १६ ।।

 

महाघोर पराक्रम करणाऱ्या, भयानक स्वरूप असणाऱ्या देवीला नमस्कार असो. हे अतिबलाढ्य, अतिउत्साही, मोठे भय नाहिसे करणाऱ्या देवि ! शत्रूंना घाबरून टाकणाऱ्या व जिच्याकडे पहाणे कीण अशा देवि, माझे रक्षण कर…

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि ।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता ।। १७ ।।
दक्षिणेऽवतु वाराही नैरृत्यां खड्गधारिणी ।
प्रतीच्यां वारुणी रक्षेद्वायव्यां मृगवाहिनी ।।१८।।
उदीच्यां रक्ष कौबेरि ईशान्यां शूलधारिणी ।
ऊर्ध्वं ब्रह्माणी मे रक्षेदधस्ताद्वैष्णवी । तथा ।। १९।।

पूर्वेला ऐन्द्री देवी माझे रक्षण करो, अग्नेय दिशेला अग्निदेवता, दक्षिणेला वाराही, नैर्ऋत्येला खड्गधारिणी, पश्चिमेला वारुणी, वायव्येला मृगवाहिनी, उत्तरेला कौबेरी, ईशान्येला शूलधारिणी, वरच्या दिशेला ब्रह्माणी, अधोदिशेला वैष्णवी याप्रमाणे शववाहना चामुण्डा देवीने दशदिशांनी माझे रक्षण करावे.

एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना ।

जया मे अग्रतः स्थातु विजया स्थातु पृष्ठतः ।।२०।।

पुढील भागापासून जया माझे रक्षण करो. विजया पृष्ठभागी, अजिता डाव्या बाजूने व अपराजिता उजव्या बाजूकडून रक्षण करो.

 

अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता ।

शिखां मे द्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता ।। २१ ।।

माझ्या शेंडीचे द्योतिनी रक्षण करो व उमादेवी मस्तकाचे रक्षण करो.

 

मालाधारी ललाटे च भ्रुवौ रक्षेद्यशस्विनी ।
त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके ॥ २२॥

मालाधारी कपाळाचे, यशस्विनी भुवयांचे, त्रिनेत्रा भुवयांच्या मध्यभागाचे व यमघण्टा नाकाचे रक्षण करो

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी ।
कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी ।। २३॥

शंखिनी दोन्ही डोळ्यांचे, द्वारवासिनी कानांचे, कालिका गालांचे व शांकरी कानांच्या आतील भागांचे रक्षण करो.

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका ।
अधरेचामृतकला जिह्वायां च सरस्वती ॥ २४ ॥

सुगंधा नाकाचे, चर्चिका वरच्या ओठाचे, अमृतकला खालच्या ओठाचे व जिभेचे सरस्वती रक्षण करो.

दंतान् रक्षतु कौमारी कण्ठमध्ये तु चण्डिका ।
घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके ॥ २५॥

कौमारी दातांचे, चण्डिका गळ्याचे, चित्रघण्टा घशाचे व टाळूचे महामाया रक्षण करो.

 

कामाक्षी चिबुकं रक्षेद्वाचं मे सर्वमंगला ।
ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी ।। २६ ।।

          कामाक्षी हनुवटीचे, सर्वमंगला वाणीचे, भद्रकाली मानेचे व धनुर्धारी पाठीच्या कण्याचे रक्षण करो.

नीलग्रीवा बहिः कण्ठे नलिकां नलकूबरी ।
खड्गधारिण्युभौ स्कन्धौ बाहू मे वज्रधारिणी ।। २७ ।।

गळ्भायाबाहेरील भागाचे नीलग्रीवा व कंठनलिकेचे नलकूबरी, खड्गधारिणी दोन्ही खांद्यांचे व वज्रधारिणी बाहूंचे रक्षण करो.

 

हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगुलीस्तथा ।
नखाञ्छूलेश्वरी रक्षेत् कुक्षौ रक्षेन्नलेश्वरी ।। २८ ।।

दण्डिनी दोन्ही हातांचे, अम्बिका सर्व बोटांचे, शूलेश्वरी नखांचे व नलेश्वरी काखांचे रक्षण करो.

 

स्तनौ रक्षेन्महालक्ष्मीर्मन: शोकविनाशिनी ।
हृदयं ललिता देवी उदरं शूलधारिणी ।। २९ ।।

महालक्ष्मी स्तनांचे, शोकविनाशिनी मनाचे, ललिता हृदयाचे व शूलधारिण पोटाचे रक्षण करो.

 

नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं गुह्येश्वरी तथा ।
पूतना कामिका मेढ्रं ऊरू महिषवाहिनी ॥३०॥

कामिनी बेंबीचे, गुह्येश्वरी गुह्यभागाचे, पूतना व कामिका लिंगाचे व महिषवाहिनी ऊरूचे रक्षण करो.

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी ।
जंघे महाबला प्रोक्ता सर्वकामप्रदायिनी ॥ ३१ ॥

भगवती कमरेचे, विन्ध्यवासिनी पोटऱ्यांचे, सर्व इच्छा पूर्ण करणारी महाबला जांघांचे रक्षण करो.

गुल्फयोर्नारसिंही च पादौ चामिततेजसी ।
पादांगुली: श्रीर्मे रक्षेत्पादाधस्तलवासिनी ॥ ३२ ॥

नारसिंही घोट्यांचे, अमिततेजसी पायांचे, श्री पायांच्या बोटांचे, तलवासिनी तळव्यांचे रक्षण करो.

नखान्दंष्ट्राः कराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी ।
रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा ।। ३३॥
दंष्ट्राकराली नखांचे, ऊर्ध्वकेशिनी केसांचे, कौबेरी त्वचेवरील केसांचे व ‘वागेश्वरी त्वचेचे रक्षण करो.

 

रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती ।
अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी ||३४||
पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा ।
ज्वालामुखी नखज्वाला अभेद्या सर्वसन्धिषु ।। ३५ ।।

पार्वती रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे व मेद यांचे, कालरात्रि आतड्यांचे, मुकुटेश्वरी पित्ताचे, पद्मावती शरीरातील कोशांचे, चूडामणि कफाचे, ज्वालामुखी नखांच्या तेजाचे व अभेद्या सर्व सांध्यांचे रक्षण करो.

शक्रं ब्रह्माणी मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा ।
अहङ्कारं मनो बुद्धिं रक्ष मे धर्मचारिणि ।। ३६ ।।
ब्रह्माणि वीर्याचे, छत्रेश्वरी सावलीचे रक्षण करो. हे धर्मचारिणी देवि, अहंकार, मन व बुद्धि यांचे रक्षण कर.

प्राणापानौ तथा व्यानं समानोदानमेव च ।
वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याण शोभना ।। ३७ ।।

कल्याण करणारी वज्रहस्ता प्राण, अपान, व्यान, समान व उदान या
वायूंचे रक्षण करो. कल्याणशोभना माझ्या प्राणांचे रक्षण करो..

रसे रुपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी ।
सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा ॥३८॥
योगिनी शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध यांचे रक्षण करो. नारायणि सदैव सत्त्व, रज व तम या त्रिगुणांचे रक्षण करो.

आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी।
यशः कीर्तिं च लक्ष्मीं च सदा रक्षतु वैष्णवी ॥ ३९॥

वाराही आयुष्याचे, वैष्णवी धर्माचे तसेच यश, कीर्ति व लक्ष्मीचे नेहमी रक्षण करो.

गोत्रमिन्द्राणी मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके ।
पुत्रान्रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी ॥४०॥

इन्द्राणी माझ्या कुळाचे, चण्डिका तू माझ्या पशूंचे रक्षण कर. महालक्ष्मी मुलांचे व भैरवी बायकोचे रक्षण करो.

धनेश्वरी धनं रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा ।
राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता । । ४१ ।।

धनेश्वरी संपत्तीचे, प्रवासात क्षेमकरी, राजदरबारी महालक्ष्मी व विजया सर्वत्र रक्षण करो.

रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु ।
तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती पापनाशिनी ॥ ४२ ॥
हे देवि, या कवचात ज्या गोष्टींचा उल्लेख रक्षणासाठी केलेला नाही त्या सर्वांचे, हे पापनाशिनी, जयन्ती, तू संरक्षण कर.

पदमेकं न गच्छेत्तु यदीच्छेच्छुभमात्मनः ।
कवचेनावृतो नित्यं यत्र यत्राधिगच्छति ॥४३॥
तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः ।
यं यं कामयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम् ।
परमश्वयमतुल प्राप्स्यत भूतल पुमान ।। ४४ ।।

आपले चांगले व्हावे अशी इच्छा करणाऱ्याने कवचाचा पाठ केल्याशिवाय एक पाऊलही जेथे जेथे जायचे असेल तेथे टाकू नये. त्याला त्या त्या ठिकाणी इच्छेप्रमाणे पैसा व यश मिळेल. जी जी इच्छा करावी ती त्याची नक्की पूर्ण होईल. या जगात त्या माणसाला अतुलनीय वैभव मिळेल.

निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः ।

त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः कवचेनावृतः पुमान् ।। ४५ ।।
तो माणूस भयरहित होऊन युद्धात पराभूत होत नाही. या कवचामुळे तो मनुष्य त्रैलोक्यात पूजनीय होतो.

इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम् ।
यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः ॥४६॥

दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येऽप्यपराजित: ।

जीवेद्वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः ।।४७।।
हे देषि, कवच देवांनाही दुर्लभ आहे. जो श्रद्धेने सकाळी, दुपारी, व संध्याकाळी नेहमी वाचतो त्याला तिन्ही लोकांत जय मिळतो. निरोगीला शंभर वर्षाचे आयुष्य लाभते. अपमृत्यु येत नाही. शरीरातील कृमि, फोड इत्यादि सर्व रोग नाहीसे होतात.

 

नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः ।
स्थावरं जंगमं वापि कृत्रिमं चापि यद्विषम् ।।४८ ।।
आभिचाराणि सर्वाणि मंत्रयंत्राणि भूतले ।
भूचरा: खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिका: ।। ४९ ।।
सहजाः कुलजा माला: शाकिनी डाकिनी तथा ।

अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः ॥५०॥
ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः ।

ब्रह्मराक्षसवेताला: कूष्माण्डा भैरवादयः ।। ५१ ।।
नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते ।

मानोन्नतिर्भवेद्राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम् ॥५२॥
स्थावर ( झाडे इत्यादि), जंगम ( साप वगैरे प्राण्यांचे) अथवा कृत्रिम विषप्रयोग, जादूटोणा, मंत्रयंत्रांचे या जगातील आपल्यावर होणारे प्रयोग या कवचामुळे नष्ट होतात. जमिनीवरील भूते, आकाशात संचार करणारे देवगण, पाण्यात वावरणारे गण, उपदेशाने मिळणारे, आपल्याबरोबर जन्मला येणाऱ्या, कुळात उत्पन्न होणाऱ्या, भूतमात्रादिकांचा तसेच माला, डाकिनी, शाकिनी, आकाशातील भयानक व अतिबलिष्ठ डाकिनी, दुष्टग्रह, भूतपिशाचे, यक्ष, गंधर्व, राक्षस, ब्रह्मराक्षस, वेताळ, कूष्माण्ड, भैरव इत्यादि, सर्व ज्यांच्या अंतःकरणात देवीवविचाचा पाठ नित्य चालतो, त्याला पहाताच नष्ट होतात. राजाचा मान वाढून त्याचा पराक्रम वाढून यश मिळते.

 

यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले ।
जपेत्सप्तशती चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा ॥५३॥
यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम् ।
तावत्तिष्ठति मेदिन्यां सन्ततिः पुत्रपौत्रिकी ॥५४॥

त्याला यश मिळाल्याने या जगात त्याची कीर्ति वाढते. जो चण्डीपाठ करुन सप्तशतीचा पाठ करतो तो मुले नातवंडांसह जोपर्यंत या पृथ्वीवर पर्वते, वने व अरण्ये असतील तो पर्यंत राहील.

 

देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् ।
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः ।। ५५।।

 

लभते परमं रूपं शिवेन सह मोदते ।
तो मनुष्य मृत्यूनंतर महामायेच्या कृपेने देवांनाही न मिळणाऱ्या अशा कायम स्थानात जातो. त्याला दिव्य शरीर मिळून तो तेथे शिवासह आनंदात राहतो. या श्रीअर्गला स्तोत्राचे ऋषि विष्णु, छंद अनुष्टुभ, श्रीमहालक्ष्मी देवता आहे. श्रीजगदम्बा प्रसन्न व्हावी म्हणून पाठ करीत आहे.
इति देव्याः कवचम् ॥

येथे देवी कवच पूर्ण झाले.

॥ अथार्गला स्तोत्रम् ॥

अस्य श्रीअर्गलास्तोत्रमंत्रस्य विष्णुऋषिः, अनुष्टुप् छन्दः,

श्रीमहालक्ष्मीर्देवता, श्रीजगदम्बाप्रीतये जपे विनियोगः ।
ॐ नमश्चण्डिकायै ।

ॐ चंडिकादेवीला नमस्कार असो.

जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते ॥ १ ॥

हे जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वधा, स्वाहा या नावाने असणाऱ्या देवि, तुला नमस्कार असो.

जयत्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणि ।
जय सर्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तुते ||२||

हे चामुण्डे देवि, प्राणिमात्रांचे दुःख हरण करणारी, सर्वांच्या अंत:करणात असलेली देवि, तुझा जयजयकार असो.

मधुकैटभविद्रावि विधातृवरदे नमः ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥३॥

मधु-कैटभ राक्षसांचा नाश करणाऱ्या व ब्रह्मदेवाला वर देणाचा देवि, तुला नमस्कार आहे. मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

महिषासुरनिर्नाशविधात्रि वरदे नमः ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥४॥
महिषासुराचा नाश करणाऱ्या, वर देणाऱ्या  देवि, तुला नमस्कार असो. मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

वन्दितांघ्रियुगे देवि सर्वसौभाग्यदायिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥५॥

सर्व सौभाग्य देणाऱ्या व ब्रह्मदेवा, तुझी चरणकमले वन्दित असणाऱ्या देवि, मला रूप दे, जय दे, व शत्रुनाश कर.

 

रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ६ ॥

रक्तबीजदैत्याचा व चण्ड-मुण्ड राक्षसांचा विनाश करणाऱ्या देवि, मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर..

शुम्भस्य वै निशुम्भस्य धूम्राक्षस्य च मर्दिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥७॥

शुम्भ, निशुम्भ व धुम्राक्ष या दैत्यांना ठार मारणाऱ्या देवि, मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

 

अचिन्त्यरूपचरिते सर्वशत्रुविनाशिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥८॥

जिचे स्वरूप व चरित्र विचारांच्या पलीकडे आहे व सर्व शत्रूंचा नाश करते, हे देवि, तू मला रूप दे, यश दे, जय दे व शत्रुनाश कर.

नतेभ्यः सर्वदा भक्त्या चण्डिके दुरितापहे ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ||९||

भक्तांनी सदैव नमस्कार करणाऱ्या, पापहारक चण्डिके, तू मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

स्तुवद्धयो भक्तिपूर्वं त्वां चण्डिके व्याधिनाशिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १०॥

हे रोगांचा नाश करणाऱ्या चण्डिके, तुझे भक्तीने स्तवन करणाऱ्यांना रूप, दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

चण्डिके सततं ये त्वामर्चयन्तीह भक्तितः ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ ११ ॥
हे चण्डिके, जे येथे तुझी भक्तीने सतत पूजा करतात त्यांना रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर..

देहि सौभाग्यमारोग्यं देहि देवि परं सुखम् ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १२ ॥

हे देवि, मला सौभाग्य, आरोग्य व अत्यंतिक सुख दे, रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर…

विधेहि द्विषतां नाशं विधेहि बलमुच्चकैः ।

रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १३ ॥

माझा द्वेष करणाऱ्यांचा नायनाट कर. मला उत्तम बलवान कर, रूप दे,
जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

विधेहि देवि कल्याणं विधेहि परमां श्रियम् ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १४ ॥

हे देवि, माझे कल्याण कर. मला भरपूर संपत्ति दे, रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

 

विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।। १५ ।।
हे देवि, मला विद्यासंपन्न, यशस्वी व श्रीमंत कर, रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.
प्रचण्डदैत्यदर्पघ्ने चण्डिके प्रणताय में ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १६ ॥

भयानक दैत्यांचा गर्व हरण करणाऱ्या चण्डिके, मी तुला नमन करीत आहे. मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

चतुर्भुजे चतुर्वक्तृसंस्तुते परमेश्वरि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १७ ॥

हे चार हात असलेल्या व ब्रह्मदेवाने स्तुति केलेल्या परमेश्वरी, मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर..

कृष्णेन संस्तुते देवि शश्वद्भक्त्या त्वमम्बिके ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।। १८ ।।

कृष्णाने भक्तिपूर्वक निरंतर स्तुति केलेल्या अंबिके, मला रूप दे, जय
दे, यश दे व शत्रुनाश कर.

 

हिमाचलसुतानाथसंस्तुते परमेश्वरि ।

रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ १९॥

हिमालयाच्या कन्येच्या पतीने (शंकराने) स्तुति केलेल्या हे परमेश्वरि मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

सुरासुरशिरोरत्ननिघृष्टचरणेऽम्बिके ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ||२०||

देव व राक्षस यांच्या मुकुटातील रत्नांनी जिचे पाय घासले जातात ( वंदन केल्यामुळे) अशा अम्बिके, मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

इन्द्राणीपतिसद्भावपूजिते परमेश्वरि ।

रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २१ ॥
इन्द्राणीपति, इन्द्र जिची भक्तिभावाने पूजा करतो त्या परमेश्वरि, मला रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

देवि प्रचण्डदोर्दण्डदैत्यदर्पविनाशिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ||२२||

प्रचंड हात असणाऱ्या राक्षसांचा गर्व हरण करणाऱ्या देवि, मला रूप  दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

देवि  भक्तजनोद्दामदत्तानन्दोदयेऽम्बिके ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २३ ॥
भक्तांना सर्वोत्तम आनंद देणाऱ्या अम्बिके देवि, मला रूप दे, जय दे. यश दे व शत्रुनाश कर.

पुत्रान्देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥ २४ ॥

मला मुले होऊ देत, संपत्ति दे, सर्व इच्छा पूर्ण करून दे, रूप दे, जय दे, यश दे व शत्रुनाश कर.

पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम् ।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम् ||२५||

सुंदर, माझ्या मनाप्रमाणे वागणारी, अवघड भवसागरातून तारणारी. उत्तम घराण्यात जन्मलेली अशी पत्नी मला दे..

इदं स्तोत्रं पठित्वा तु महास्तोत्रं पठेन्नरः ।
स तु सप्तशतीसंख्यावरमाप्नोति संपदाम् ॥२६॥

मार्कण्डेय पुराणे अर्गला स्तोत्रम् ।
हे अर्गलास्तोत्र वाचून नंतर सप्तशतीचा पाठ करणाऱ्यास सातशे वरांची संपत्ती मिळते. असे मार्कण्डेय पुराणातील अर्गलास्तोत्र आहे.

 

अथ कीलकस्तोत्रम् ।
अस्य श्रीकीलकस्तोत्रमंत्रस्य शिवऋषिः, अनुष्टुप्छंद:, श्रीमहासरस्वती देवता, श्रीजगदम्बाप्रीत्यर्थं जपे विनियोगः ।
या कीलकस्तोत्राचे ऋषि शिव आहेत,

 

छंद अनुष्टुप् देवता श्रीमहासरस्वती कीलकस्तोत्र ।
असून श्रीजगदम्बा प्रसन्न व्हावी म्हणून जप करीत आहे.

ॐ नमश्चण्डिकायै ।
श्री चण्डिकेला नमस्कार असो.

मार्कण्डेय उवाच –

विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदीदिव्यचक्षुषे ।
श्रेयः प्राप्तिनिमित्ताय नमः सोमार्धधारिणे ॥ १ ॥

मार्कण्डेय ऋषि म्हणतात –
अतिशय शुद्ध ज्ञानरूप देह असणाऱ्या, ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे तीन वेद ज्याचे तीन डोळे आहेत, मस्तकी चंद्र धारण करणाऱ्या (शिवाला) मी कल्याण व्हावे, म्हणून नमस्कार करत आहे. –

सर्वमेतद्विना यस्तु मन्त्राणामपि कीलकम् ।
सोऽपि क्षेममवाप्नोति सततं जाप्यतत्परः ॥२॥

अन्य मंत्र न जपता फक्त कीलकाचेच सतत पठण व जप करतो त्याचे कल्याण होते.

सिद्ध्यन्त्युच्चाटनादीनि वस्तूनि सकलान्यपि ।
एतेन स्तुवतां नित्यं स्तोत्रमात्रेण सिद्धयति ॥३॥

कीलकाच्या जपाने जारण मारण उच्चाटन इत्यादि सिध्दि मिळून त्या देवता पावतात..

न मन्त्रो नौषधं तत्र न किंचिदपि विद्यते ।
विना जाप्येन सिद्धयेत सर्वमुच्चाटनादिकम् ||४||

कीलकाच्या जपाशिवाय कोणताही मंत्र, औषधि मिळत नाही व जारण- उच्चाटनादि विद्या सिद्ध होत नाहीत.

समग्राण्यपि सिद्धयंति लोकशंकामिमां हरः ।
कृत्वा निमन्त्रयामास सर्वमेवमिदं शुभम् ॥५॥

सर्व सिध्दि कशा प्राप्त होतील या प्रश्नाला उत्तर म्हणून शिवाने शुभप्रदकीलक तयार केलेले आहे..

स्तोत्रं वै चण्डिकायास्तु तच्च गुह्यं चकार सः ।
समाप्तिर्न च पुण्यस्य तां यथावन्नियन्त्रणाम् ||६||

त्यानंतर अतिशय गुप्तस्वरूपाचे चण्डिकेचे (सप्तशती) स्तोत्र शंकराने रचले. त्याचे यथाविधि पठण केल्याने पुण्य संपत नाही.

सोऽपि क्षेममवाप्नोति सर्वमेव न संशयः ।
कृष्णायां वा चतुर्दश्यामष्टम्यां वा समाहितः ||७||

कृष्ण पक्षातील अष्टमी अथवा चतुर्दशीला सप्तशतीपाठ केल्याने सर्व कल्याण

होईल यात शंका नाही. ददाति प्रतिगृह्णाति नान्यथैषा प्रसीदति ।
इत्थंरूपेण कीलेन महादेवेन कीलितम् ॥८॥

आपण पाठ करतो, दुसऱ्यालाही सांगतो त्याचे कल्याण होते. या शिवाय देवी पावत नाही. हे शापोद्धारक कीलक शंकरांने रचले आहे.

यो निष्कीलां विधायैनां नित्यं जपति सुस्फुटम् ।
ससिद्धः सगणः सोऽपि गन्धर्वो जायते वने ॥९॥

जो कीलक वाचून नंतर नेहमी सप्तशतीचा पाठ करतो तो सिद्ध, गण अथवा गंधर्वही होतो.

न चैवाप्यटतस्तस्य भयं क्वापि हि जायते ।
नाऽपमृत्युवशं याति मृतो मोक्षमवाप्नुयात् ॥१०॥

तो कोठेही जात असला तरी त्याला भीति नसते, त्याला अपमृत्यु येत नाही व तो मरणानंतर मोक्षाला जातो.

ज्ञात्वा प्रारभ्य कुर्वीत ह्यकुर्वाणो विनश्यति ।
ततो ज्ञात्वैव सम्पन्नमिदं प्रारभ्यते बुधैः ॥११॥

हे सर्व जाणून घेऊन कीलकस्तोत्राचा पाठ करावा, न केल्यास नाश होतो म्हणून जाणत्यांनी उमजून घेऊन पाठास सुरुवात करावी.

सौभाग्यादि च यत्किंचिद्दृश्यते ललनाजने ।
तत्सर्वं तत्प्रसादेन तेन नाप्यमिदं शुभम् ॥१२॥

स्त्रियांना मिळणारे सौभाग्य इत्यादि जे दिसते ते सर्व देवीच्या कृपेने मिळते म्हणून हे कल्याणकारक स्तोत्र म्हणावे.

शनैस्तु जप्यमानेऽस्मिन्स्तोत्रे सम्पत्तिरुच्चकैः ।
भवत्येव समग्रापि ततः प्रारभ्यमेव, तत् ॥१३॥
या स्तोत्राचा सावकाश पाठ केल्याने संपत्ति प्राप्त होते म्हणून याचा पाठ सुरुवातीला करावा.

ऐश्वर्यं यत्प्रसादेन सौभाग्यारोग्यसम्पदः ।
शत्रुहानि: परोमोक्षः स्तूयते सा न किं जनैः ॥१४॥

भगवत्याः कीलकस्तोत्रम् ॥

जिच्या कृपेने वैभव, सौभाग्य, आरोग्य, संपत्ति मिळते, शत्रूचा नाश होतो, मोक्ष मिळतो त्या देवीची स्तुति लोक का करणार नाहीत? असे हे भगवतीचे कीलकस्तोत्र आहे.

दुर्गादेवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं । अनाथनाचें अंबे करुणा विस्तारीं ॥

वारीं वारीं जन्ममरणातें वारीं । हारीं पडलों संकट नीवारीं ॥१॥
जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी | सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ जय ॥०||धृ०॥

त्रिभुवनभुवन पहातां तुज ऐसी नाहीं। चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं ॥
साही विवाद करितां पडले प्रवाहीं । ते तूं भक्तां लागीं पावसि लवलाही ॥ जय० ॥२॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा । क्लेशापासूनि सोडीं तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपकज लेशा॥ जय० ॥ ३ ॥

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply